गोवा : माहिती आणि प्रसिद्धी खात्यात श्री सत्यनारायण महापूजा 

श्री सत्यनारायणाचे पूजन

पणजी, ९ सप्टेंबर (स.प.) – पणजी येथील माहिती आणि प्रसिद्धी खात्यात ९ सप्टेंबरला श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली. प्रतिवर्षी श्रावण मासात ही पूजा या खात्यात साजरी केली जाते. यावर्षी या वार्षिक श्री सत्यनारायण पूजेचे यजमानपद श्री. पुरुषोत्तम परवार आणि सौ. पूनम परवार यांनी भूषवले. सकाळी पूजा, त्यानंतर आरती, भजन, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद झाला.

आरती म्हणतांना खात्यातील कर्मचारी आणि महिला भजनी मंडळ

यंदा नागझरवाडा, भोम येथील श्रीकृष्ण नागझरकर, बाल भजनी मंडळाशी संबंधित महिला यांनी भजन सादर केले. त्यानंतर अधिकार्‍यांच्या हस्ते आरती करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे या पूजेला स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रसारमाध्यमे यांचे प्रतिनिधी अन् पणजीवासीय यांनी मोठ्या प्रमाणात पूजेच्या ठिकाणी भेट देऊन प्रार्थना केली आणि आशीर्वाद घेतले.