नवी देहली – ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी लोकांना यापूर्वीच सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आता केंद्र सरकारने लोकांकडून त्यांच्या सूचना मागवल्या आहेत. अशा प्रकारच्या फसवणुकीसाठी रचण्यात येणार्या रणनीतीला ‘डार्क पॅटर्न’ असे म्हटले जाते. त्यामुळे सरकारने या शब्दाचा वापर करून तसे आवाहन केले आहे. सरकारने ५ ऑक्टोबरपर्यंत या सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे विक्रेते आणि जाहिरातदार यांच्यासह सर्व लोकांसाठी अन् ऑनलाइन मंचांसाठीही लागू केली जातील. असे जरी असले, तरी लोकांना ‘डार्क पॅटर्न’ म्हणजे काय ?, हे ठाऊक नसल्याने सरकारला किती सूचना मिळतील, असा प्रश्न आहे. (जनतेला समजेल अशा भाषांत जनतेला सांगायला हवे, हे प्रशासनाला कळत कसे नाही ? – संपादक)