युवा शिबिराच्या वेळी कु. संजना कुलकर्णी हिला जाणवलेली सूत्रे

कु. संजना कुलकर्णी

१. ‘मी युवा शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जात असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या खोलीच्या आगाशीत उभे राहून आम्हा सर्व साधकांची वाट पहात आहेत’, असे मला जाणवले.

२. मार्गावरील गोमाता शिबिरासाठी शुभेच्छा देत असल्याचे जाणवणे : निवासाकडून शिबिराच्या स्थळी येत असतांना आम्हाला मार्गावर गोमाता दिसल्या. ‘त्या आम्हाला आशीर्वाद आणि शिबिरासाठी शुभेच्छा देत आहेत’, असे मला वाटले. त्या वेळी मी प्रार्थना केली, ‘गोमातेमध्ये स्थित असलेल्या ३३ कोटी देवांची आमच्यावर कृपादृष्टी असू दे.’

– कु. संजना संकेत कुलकर्णी (वय १७ वर्षे), पुणे (१७.११.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक