१. शिबिराला जाण्याचे ठरवल्यावर अकस्मात् निर्माण झालेली अडचण भगवंताला प्रार्थना केल्यावर सुटून शिबिराला जाता येणे
‘मी शिबिराला जाण्याचे ठरवल्यावर मला अकस्मात् एक महत्त्वाचे काम आले. ते पुष्कळ अवघड होते आणि त्यासाठी पुष्कळ वेळ लागणार होता, तरीही मला शिबिरासाठी सनातनच्या आश्रमात जाऊन तेथील चैतन्य अनुभवायचे होते. तेथे संतांना पहायचे होते. त्यासाठी मी देवाला मनापासून कळकळीने प्रार्थना केली, ‘हे भगवंता, मला गोव्यात रामनाथीला जायचे आहे. तेथील चैतन्य अनुभवायचे आहे. त्या वातावरणातील कणाकणांतील गुरूंचे दर्शन सूक्ष्मातून घ्यायचे आहे. त्यामुळे हे काम तूच वेळेत पूर्ण करून घे आणि मला रामनाथीला घेऊन चल’. त्यानंतर माझे काम वेळेच्या आधीच पूर्ण झाले आणि मला आश्रमात येता आले. त्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
२. आश्रमातील चैतन्यामुळे शिबिरात शिकवलेल्या कृतींचे पटकन आकलन होणे
मी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाला जात होते. त्या वेळी तेथील एक साधक जे काही प्रकार किंवा काही प्रसंग शिकवायचे त्यांचे मला पटकन आकलन होत नव्हते; परंतु येथे मला शिबिरात शिकवलेले सर्व काही एकदाच कृती करूनही आकलन होत होते. तेव्हा येथील वातावरणातील चैतन्य आणि उत्साह मला अनुभवता आला. यासाठी गुरुचरणी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी) कृतज्ञता !’
– कु. निलम विजय पांचाळ, राजापूर, जिल्हा रत्नागिरी. (२.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |