नूंह (हरियाणा) येथील हिंदूंची जलाभिषेक यात्रा २८ ऑगस्टलाच निघणार !

  • हिंदु महापंचायतीत एकमुखी निर्णय !

  • अर्धसैनिक दल आणि पोलीस मोठ्या प्रमाणात उपस्थित !

पलवल (हरियाणा) – गेल्या मासात ३१ जुलैला राज्यातील नूंह येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर आक्रमण केल्याने यात्रा पूर्ण होऊ शकली नव्हती. या दृष्टीने १३ ऑगस्ट या दिवशी पलवल जिल्ह्यातील पोंडरी या गावात सर्वजातीय हिंदु महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित हिंदूंनी २८ ऑगस्ट या दिवशी ब्रजमंडल जलाभिषेक यात्रा करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच नूंह जिल्ह्यामध्ये मुसलमान बहुसंख्य असल्याने नूंह जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणीही केली. नूंह जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येत ७९.२ टक्के लोक मुसलमान आहेत.

१. महापंचायतीला संबोधित करणार्‍या हिंदु नेत्यांनी ३१ जुलै या दिवशी झालेल्या हिंसाचारास प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे म्हटले. हिंदु नेते म्हणाले की, गुप्तचर विभागाकडून सूचना मिळाल्यावरही पोलीस आणि प्रशासन यांनी दायित्वशून्यता दाखवल्यानेच हिंदूंवर आक्रमण झाले. हिंसाचाराच्या अन्वेषणाचे दायित्व राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे देण्यात यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

२. सर्व वक्त्यांनी संयत भाषेचा उपयोग केल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली.

३. महापंचायतीच्या दृष्टीने पोलीस आणि अर्धसैनिक दल यांचे अनेक सैनिक या वेळी तैनात करण्यात आले होते.

४. या महापंचायतीला राज्यातील सोनीपत, पलवल, फरीदाबाद, गुरुग्राम आणि नूंह जिल्ह्यांतील लोक, तसेच देहली आणि उत्तरप्रदेश येथूनही हिंदू सहभागी होण्यासाठी आले होते.

५. महापंचायतीत बजरंग दलाचे हरियाणा प्रदेश संयोजक भारत भूषण, सोहनाचे भाजपचे आमदार संजय सिंह, पलवलचे भाजपचे माजी आमदार सुभाष चौधरी यांच्यासह वि.हिं.प.चे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.

संपादकीय भूमिका

बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांच्याच धार्मिक यात्रांचे आयोजन करण्यासाठी एवढा खटाटोप का करावा लागतो ? हे हिंदूंसाठीच लज्जास्पद !