नवी मुंबई, १२ ऑगस्ट (वार्ता.) – वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या इमारतीमध्ये वाचनालय बांधण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतला आहे. त्यानुसार वाचनालय निर्मितीचे काम चालू करण्यात आले आहे. हे वाचनालय उभारण्याकरिता ३ कोटी ६५ लाख १४ सहस्र रुपये खर्च येणार आहे.