भगवंताशी एकरूप होतांना स्वतःच्या प्रत्येक कृतीत त्याचाच भास होऊ लागतो. याविषयी अनुभवलेले क्षणमोती !
मोहक देवाला (टीप) पहाता पहाता ।
मनही माझे होई मोहक ॥ १ ॥
देवाचे गोड बोलणे ऐकता ऐकता ।
माझेही बोलणे होई गोड ॥ २ ॥
देवाचे मधुर हास्य स्मरता स्मरता ।
माझेही हास्य होई मधुर ॥ ३ ॥
देवाचे पहाणे इतके कृपाळू ।
माझ्या नेत्री येती भावाश्रू ॥ ४ ॥
इतके हळुवार चालणे देवाचे ।
क्षणभर थबकती माझी पावले ॥ ५ ॥
देवाचे सारेच असे दैदीप्यमान ।
श्वासोच्छ्वासी करते गुणगान ॥ ६ ॥
टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१०.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |