मुसलमान व्यापार्‍यांमुळे गौहत्तीमध्ये भाज्यांचे दर वाढले ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा दावा !

डावीकडून हिमंत बिस्व सरमा आणि असदुद्दीन ओवैसी

गौहत्ती (आसाम) – ते कोण आहेत ज्यांच्यामुळे भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत ? गौहत्तीमध्ये ते मिया व्यापारी आहेत जे आसामी व्यापार्‍यांना अधिक दराचे भाज्या विकत आहेत. वास्तविक गावांमध्ये भाज्या अल्पदराने मिळत आहेत. जर आसामी व्यापार्‍यांनी भाज्यांची विक्री केली असती, तर त्यांनी आसामी लोकांकडून भाज्यांसाठी अधिक पैसे उकळले नसते, असे विधान आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले आहे. आसाममध्ये बंगाली मूळच्या मुसलमानांना शक्यतो ‘मिया’ शब्दाने संबोधिले जाते. हे लोक मूळचे बांगलादेशातून आले होते.

एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मुख्यमंत्री सरमा यांच्या विधानावर टीका केली आहे. ते म्हणाले की, देशात एक असा समूह आहे जो स्वतःच्या घरातील म्हशीकडून दूध न मिळाल्याचा आणि कोंबडीने अंडे न दिल्याचा  दोषही मुसलमानांना देतो. कदाचित् ते स्वतःचे अपयश मुसलमानांवर टाकत आहेत. पंतप्रधान मोदी यांची विदेशी मुसलमानांशी विशेष मैत्री चालू आहे. मोदी यांनी त्यांच्याकडून टोमॅटो, पालक, बटाटे आदी मागवून काम चालवावे, असा टोमणा ओवैसी यांनी मारला आहे. (एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जर अशा प्रकारचा दावा करत असेल, तर त्यामागे काहीतरी कारण असल्याची शक्यता आहे; मात्र ओवैसी यांच्यासारख्या नेत्यांना त्यांचे धर्मबांधव अगदी धुतल्या तांदुळासारखे आहेत, असेच वाटत असते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

‘मुख्यमंत्री सरमा जो दावा करत आहेत, तसा भाग देशातील अन्य ठिकाणी होत आहे का ?’, याची निश्‍चिती करण्याची आवश्यकता आहे ! तसे असेल, तर अशा व्यापार्‍यांवर कुणी बहिष्कार घालण्याचे आवाहन केले, तर आश्‍चर्य वाटू नये !