१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अकरावे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन (वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव) चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.


‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’निमित्त गोवा येथे आलेल्या मान्यवरांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर दिलेले अभिप्राय
१. ‘रामनाथी आश्रमातील संपूर्ण वातावरण अध्यात्म आणि सात्त्विकता यांनी भरलेले आहे. आश्रमात तेज जाणवते. थोडक्यात ही व्यक्तीमत्त्व विकास करणारी प्रयोगशाळा आहे.’ – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र (सभापती (एशिया चॅप्टर)), विश्व ज्योतिष महासंघ, पाटणा, बिहार आणि श्रीमती हरिप्रिया देवी (डॉ. कुमार यांच्या पत्नी) (सभापती, साउथ एशियन एस्ट्रो फेडरेशन (भारत संभाग)), पाटणा, बिहार.
२. मनाला प्रसन्न करणारी आश्रमव्यवस्था !
‘आश्रमातील व्यवस्था आणि स्वच्छता पुष्कळ छान अन् मनाला प्रसन्न करणारी आहे. येथे पुष्कळ सात्त्विकताही आहे. – डॉ. राजेंद्र दीक्षित, सचिव, परशुराम सर्वभाषीय ब्राह्मण संघ, नागपूर, महाराष्ट्र.
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
- ‘हे प्रदर्शन पाहिल्यावर अतिशय दैवी अनुभव मिळाला आणि ‘सकारात्मकतेच्या समवेतच विघ्न निर्माण करण्यासाठी नकारात्मकता सक्रीय असते’, याचे ज्ञान झाले.’ – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, पाटणा, बिहार.
‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation) पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय
१. ‘हिंदु सनातन धर्मातील परंपरेनुसार विषयांवर आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोनातून संशोधन करणे काळानुसार आवश्यक आहे’, असे वाटले.’ – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, पाटणा, बिहार.
२. ‘या विषयावर जे संशोधन होत आहे, ते नक्कीच प्रशंसनीय आहे’, असे वाटले.’ – डॉ. राजेंद्र दीक्षित, नागपूर.
३. ‘संगीत कलाकाराने साधनाही करावी. कला ही केवळ पैसा कमावण्याकरता नसून संगीत कलाकाराने साधनाही करायला हवी’, असे वाटले.’ – श्री. गोरक्षनाथ भराडे, श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान, नगर, महाराष्ट्र.
(सर्व सूत्रांचा दिनांक १५.६.२०२३)
|
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !