पाकिस्तानच्या कारागृहातील भारतीय मासेमार्‍याचा मृत्यू

  • गेल्या २ मासांतील चौथी घटना  

  • शिक्षा पूर्ण होऊनही पाकच्या कारागृहात आहेत ४०० भारतीय !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या कारागृहात बंद असणार्‍या बालू जेठा या मासेमार्‍याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे जेठा यांची शिक्षा पूर्ण झाली होती आणि त्यांची लवकरच सुटका करण्यात येणार होती; मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या २ मासांतील अशा प्रकारची ही चौथी घटना आहे. यापूर्वी विपन कुमार, झुल्फिकार आणि सोमा देव या मासेमार्‍यांचा मृत्यू झाला होता. ३ अन्य मासेमार्‍यांची प्रकृती चिंताजनक आहे. पाकिस्तानने शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही ४०० हून अधिक भारतियांना कारागृहात डांबून ठेवले आहे.

प्रतिवर्षी भारत आणि पाकिस्तान यांना त्यांच्या कारागृहांत बंद असणार्‍या एकमेकांच्या नागरिकांची माहिती द्यावी लागते. त्या माहितीनुसार पाकमध्ये भारताचे ७०५ नागरिक अटकेत आहेत, तर भारतात पाकचे ४३४ नागरिक अटकेत आहेत.

सामाजिक 

जागतिक मानवाधिकार संघटना याकडे लक्ष देत नाहीत, हे लक्षात घ्या !