तुर्कीयेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एर्दोगन पुन्हा विजयी !

तुर्कीयेच्या १०० वर्षांच्या इतिहासात ठरले सर्वाधिक काळ राज्य करणारे नेते !

इस्तंबुल (तुर्कीये) – तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसिप तय्यीप एर्दोगन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. दोन दशकांपासून देशावर राज्य करणार्‍या एर्दोगन यांच्यासाठी यंदाची लढत चुरशीची होती. या निवडणुकीत विजय मिळाल्याने ते तुर्कीयेच्या १०० वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणारे नेते बनले आहेत. विजयानंतर ते म्हणाले, ‘आपण एकता आणि सामंजस्य यांच्या आधारावर कार्य करूया !’

एर्दोगन यांचा समलैंगिकतेला विरोध !

इस्लामी परंपरांचे समर्थन करणारे एर्दोगन यांनी संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारात समलैंगिकतेला विरोध करून ‘विरोधी पक्ष कशा प्रकारे समलैंगिकतेला प्रोत्साहन देत आहेत ?’, याविषयी प्रचार केला. ते म्हणाले की, पाश्‍चिमात्यांचे उदारमतवादी धोरण त्यांच्या, तसेच त्यांच्या मित्रपक्षांमध्ये राबवले जाणार नाही.