पुणे – अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून तिचा मृतदेह तळेगाव रेल्वे स्थानकाशेजारी टाकणार्या राहुल बरई, इशान कुरेशी आणि संतोष जुगदर या तिघांना न्यायालयाने मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप आणि २५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा निकाल दिला. ही घटना ६ मे २०१४ या दिवशी घडली होती. या प्रकरणी २८ साक्षीदार पडताळण्यात आले होते.
#Pune_Crime_News | अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून खून करणार्या तिघांना मरेपर्यंत दुहेरी जन्मठेपhttps://t.co/CRM5u9oJqR@Policenama1 #policenama @PuneCityPolice @CPPuneCity @DGPMaharashtra
— Policenama (@Policenama1) May 26, 2023
जुगदार याने मुलीला फूस लावून नालासोपारा येथील एका इमारतीमध्ये नेले. त्या ठिकाणी तिघांनी तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिने पोलिसांमध्ये तक्रार करू नये, याकरता तिची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह बॅगेत भरून तळेगाव रेल्वे स्थानकाशेजारी टाकून दिला होता.
संपादकीय भूमिकाअशांना तात्काळ फाशीची होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तरच असे कृत्य करू पहाणार्यांवर वचक बसेल ! |