भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना राज्य सरकारने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. धीरेंद्रकृष्ण शास्त्री सातत्याने हिंदू राष्ट्राविषयी विधाने करत आहेत. त्यांच्या विधानांना विरोध होऊ लागला आहे. दुसरीकडे त्यांच्या कार्यक्रमांना सहस्रोंच्या संख्येने गर्दी जमत आहे. त्यांंच्या विरोधकांची संख्याही वाढू लागली आहे. अनेक संघटनांनी त्यांना आव्हाने दिली आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
बाबा बागेश्वर को मिली जान से मारने की धमकी -अब हिंदू राष्ट्र बनाने वाले धीरेंद्र शास्त्री को Y कैटेगरी सुरक्षा।#bababageshwar pic.twitter.com/hWXNXL4YGR
— News18 Uttar Pradesh (@News18UP) May 25, 2023
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या जीवनावर चित्रपट येणार
‘द बागेश्वर सरकार’ या नावाने बागेश्वर धाम सरकारचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्यात येणार आहे. विनोद तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट हिंदीसमवेत इतर अनेक भाषांमध्येही बनणार आहे.
‘वाय’ दर्जाची सुरक्षा म्हणजे काय ?
देशातील सुरक्षायंत्रणेच्या अनेक श्रेणी आहेत. एखाद्याला कोणत्या प्रकारची सुरक्षा पुरवली जावी यासंदर्भात गुप्तचर विभागाच्या अहवालाच्या आधारे त्याचे मूल्यांकन केले जाते. देशात सुरक्षेची यंत्रणा ४ टप्प्यांत विभागली गेली आहे. ज्यामध्ये ‘झेड प्लस’ ही सुरक्षा सर्वांत वरची समजली जाते. त्यानंतर ‘झेड’, ‘वाय’ आणि ‘एक्स’ या सुरक्षाव्यवस्था आहेत. ‘वाय’ श्रेणीच्या सुरक्षेत ११ सुरक्षारक्षक असतात. ज्यामध्ये १ किंवा २ कमांडो आणि पोलीस कर्मचारी यांचा समावेश असतो. याअंतर्गत २ खासगी सुरक्षा अधिकारीही असतात.
शालेय अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत यांचा समावेश करा ! – धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची मागणीमध्यप्रदेशातील नक्षलग्रस्त बालाघाट जिल्ह्यात धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या हनुमंत कथेचा कार्यक्रम होत आहे. या वेळी त्यांनी ‘हिंदु राष्ट्राचे सूत्र धार्मिक नसून सांस्कृतिक आहे’, असे विधान केले, तसेच रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांचा शालेय अभ्यसक्रमात समावेश करावा, अशी मागणी केली. |