|
चिखली (बुलढाणा) – १७ मे या दिवशी येथील एका घरातील विवाहाच्या वरातीत डी.जे.वर (मोठी संगीत यंत्रणा) भगवान श्रीरामाचे गाणे लावले होते. ही वरात सैलानीनगर या भागातून जात असतांना धर्मांधांकडून हे गाणे थांबवण्यास सांगण्यात आले. त्याच वेळी धर्मांधांनी या वरातीवर जोरदार दगडफेक चालू केली. (याचा अर्थ दंगल पूर्वनियोजितच होती. दंगलीसाठी निमित्त शोधणार्या धर्मांधांवर कायमस्वरूपी जरब बसवण्यासाठी सरकार काय उपाय काढणार ? – संपादक) या दगडफेकीत वरातीतील १३ हून अधिक लोक घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. याच वेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या वेळी धर्मांधांनी डी.जे.ची यंत्रणाही तोडून टाकली. (पोलिसांनी लगेचच रुग्णालयाचा आणि डी.जे.चा खर्च धर्मांधांकडून भरून घ्यायला हवा ! – संपादक) या वेळी धर्मांधांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. (अशा घोषणा देणार्यांना दिवाळखोर पाकमध्ये भूकबळी जाण्यासाठी पाठवण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! – संपादक)
(सौजन्य : ABP MAJHA)
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘पाकिस्तानच्या घोषणा देणार्या आरोपींना सोडणार नाही’, असे म्हटले आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले आणि खासदार प्रतापराव जाधव यांनी या भागाचा दौरा करून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंना त्यांच्या देशात श्रीरामाचे गाणे लावणेही किती कठीण झाले आहे, याची नोंद सरकार गांभीर्याने कधी घेणार ? हिंदुत्वनिष्ठ सरकार राज्यात असतांना अशा प्रकारच्या घटना घडतच रहाणे, हे अपेक्षित नाही ! |