‘वर्ष २०१९ मध्ये ‘हलाला’ (तलाक (घटस्फोट) दिल्यानंतर पुन्हा त्याच पतीशी विवाह करण्यापूर्वी दुसर्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवणे होय) प्रथेवर आधारित ‘हलाला अ कर्स’ नामक चित्रपटालाही काँग्रेसने विरोध केला; मात्र चित्रपट निर्मात्याने ‘हलाला प्रथे’चे भीषण सत्य न्यायालयासमोर सिद्ध केल्यामुळे काँग्रेसचा विरोध फोल ठरला. वर्ष २०१० मध्ये केरळ उच्च न्यायालयातही ‘लव्ह जिहाद’चे सत्य समोर आले. हे रोखण्यासाठी सरकारने आंतरधर्मीय विवाहावर निर्बंध आणणे आवश्यक आहे. याच आधारावर ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे. ‘लोकसंख्या वाढ’, ‘लँड (भूमी) जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ ही इस्लाम राष्ट्र निर्मितीसाठीची ध्येय-धोरणे आहेत. साम्यवादी आणि पश्चिमी प्रसारमाध्यमे याला ‘काल्पनिक कथा’ म्हणतात. काश्मीरमधील आतंकवादात पाकिस्तान सहभागी असल्याचे तेथे होत असलेल्या हिंसक घटनांनी लक्षात येते, तर केरळमधील आतंकवाद हा ‘लव्ह जिहाद’ हा ‘सॉफ्ट टेरेरिझम’चा (सौम्य आतंकवादाचा) भाग असून यामागे ‘सौदी’ आणि ‘सीरिया’ यांसारखे देश आहेत.’