भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात काही मुसलमानांनी शिवपिंडीवर हिरवी चादर चढवण्याचा प्रयत्न केला. ‘त्र्यंबकेश्वरावर हिरवी चादर चढवण्यासाठी आलो आहोत’, अशा प्रकारे कुटील डाव आखून नि ‘आमची ही प्रतिवर्षीची परंपरा आहे’, असा साळसूदपणाचा आव आणून ४ मुसलमान १३ मेच्या रात्री मंदिराच्या उत्तर महाद्वारातून आत येण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अडवण्यात आले, तसेच या संदर्भात मंदिर व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या हिंदु धर्मविरोधी कृत्याचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांच्या विरोधात खरेतर त्वरित कारवाई होणे अपेक्षित होते; परंतु राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्यावर घटनेच्या ३ दिवसांनंतर घटनेचे अन्वेषण करण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले, तसेच या चौघांना अटक करण्यात आली. हाच प्रकार जर हिंदूंकडून मुसलमानांच्या धार्मिक स्थळांसंदर्भात घडला असता, तर शासकीय व्यवस्था एवढ्या कूर्मगतीने हाकली गेली असती का ? ‘एखाद्या समाजाच्या धार्मिक भावनांचे मोल हे त्याच्या मतांच्या वजनावरून ठरवले जाते’, हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैवी वास्तव शेजारील कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांतून पुन्हा एकदा यशस्वीपणे प्रत्यक्षात उतरले आहे. एकूणच हिंदूंना त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या भयावह प्रकारातून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे. ही घटना साधी दिसत असली, तरी त्याचे अन्वयार्थ बरेच आहेत.
तीर्थक्षेत्री अहिंदू नकोत !
मुळात या मंदिरात अहिंदूंना प्रवेश नसतांना तेथे काही मुसलमान येण्यास धजावतात कसे ? मुसलमानांच्या मक्का-मदिना शहरांत काही किलोमीटरच्या परिघात एकाही मुसलमानेतराला प्रवेश नाही. केवढी ही धर्मांधता ! हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांच्या संदर्भात अशा प्रकारची कट्टरता हिंदू कधीच दाखवत नाहीत !
गेल्याच मासात अक्षय्य तृतीया साजरी करण्यात आली. त्याच दिवशी मुसलमान समाजाने ईद साजरी केली. अनेक हिंदूंनी त्यांच्या मुसलमान मित्रांना ईदच्या शुभेच्छा दिल्या; परंतु किती मुसलमानांनी हिंदूंना साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणार्या अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या ? हा विषय सामाजिक माध्यमांतून पुष्कळ चर्चिला गेला. यात काही जन्महिंदूंची दिशाहीन विचारसरणी पहायला मिळाली. म्हणे ‘हिंदूंच्या दिवाळी, गुढीपाडवा यांसारख्या मोठ्या सणांना त्यांचे मुसलमान मित्र शुभेच्छा देतात. आता आपले एवढे सण असतांना त्यांनी सारख्या-सारख्या शुभेच्छा का द्याव्यात ?’ सकृतदर्शनी हा तर्क बरोबर वाटला, तरी ‘आपला हिंदु मित्र ईदच्या शुभेच्छा देत असतांना आपणही त्याला त्याच्या त्याच दिवशी असणार्या सणाच्या शुभेच्छा द्यायलाच हव्या’, हा साधा व्यवहार जन्महिंदूंच्या मुसलमान मित्रांना पूर्ण करावासा वाटत नाही ? तोच नियम त्र्यंबकेश्वर मंदिरासंदर्भातही लागू होतो. जर हिंदूंच्या मंदिरामध्ये अहिंदूंना प्रवेश नसण्याचा नियमच आहे आणि तो नियम मोडला, तर हिंदूंच्या भावना दुखावतात, तर मुसलमान मंदिरात घुसण्याचा प्रयत्न का करतात ? काही आठवड्यांपूर्वी कर्नाटकातील जगप्रसिद्ध हम्पी या प्राचीन शहरात असलेल्या हनुमान मंदिरात काही मुसलमान येऊन तेथे मांसाहार करत असल्याचे आढळून आले होते. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे हे प्रयत्न काही नवीन नाहीत. त्यामुळे ‘त्र्यंबकेश्वर, अयोध्या, वाराणसी, तिरुपती आदी तीर्थक्षेत्रांच्या शहरांत एकाही अहिंदूला रहाण्याचा अधिकार देण्यात येऊ नये’, यासाठी योजना आखावी का ? ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ची शिकवण असणारे हिंदू असा विचार कधीच करत नाहीत; परंतु त्र्यंबकेश्वर मंदिरासारखे प्रकार घडू लागल्यास मात्र अशा प्रकारचे नियम आखण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले जात आहे का ? हे प्रश्न अनुत्तरित रहातात.
हिंदू ‘सर तन से जुदा’ करतात का?
एरव्ही एखाद्या मशिदीसमोरून हिंदूंची मिरवणूक गेली, तरी मशिदीतून तलवारी घेऊन लोक हिंदूंवर आक्रमण करतात. त्यांच्यावर दगडफेक केली जाते. यात अनेक हिंदू घायाळ होतात, तर काही वेळा काहींचा मृत्यू होतो. ही स्थिती गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. धर्मांध मुसलमानांचा हा सुळसुळाट हिंदूंच्या मुळावर उठलेला आहे. आता तर हे हिंदूंच्या पवित्र मंदिरांना भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. याविरोधात हिंदू मात्र केवळ तक्रार प्रविष्ट करतात आणि शाब्द़िक विरोध करून गप्प बसतात. जर हिंदूंनी अशा प्रकारचे धैर्य मुसलमानेतरांना प्रवेश नसलेल्या एखाद्या प्रसिद्ध मशीद अथवा दर्गा येथे केले असते, तर काय झाले असते ? आमच्याकडे कुणा नुपूर शर्मासारख्या हिंदु महिलेने महंमद पैगंबर यांचा कथित शाब्द़िक अवमान केल्यावरून त्यांना ठार मारण्याचे फतवे निघतात आणि धार्मिक भावना दुखावण्याच्या नावाखाली काही हिंदूंना ठार केले जाते. ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देऊन ती प्रत्यक्षात साकार केली जाते. सरकारी मालमत्तेची हानी होते. ‘जिहाद’चा आगडोंब उसळतो. हिंदू मात्र सामोपचाराने सर्वकाही स्वीकारतात. हिंदूंच्या या सद़्गुणविकृतीचाच हा परिपाक आहे का ?
वर्ष १६९० मध्ये औरंगजेबाने त्र्यंबकेश्वर मंदिरावर आक्रमण करून ते पाडण्याचा प्रयत्न केला होता. ‘औरंगजेबाचा इतिहास’ या जदुनाथ सरकार लिखित पुस्तकात याचा दाखला आहे. त्या वेळी विषारी किडे, विंचू आणि साप यांनी गर्भगृह नष्ट करण्यासाठी आलेल्या मुसलमानांना पळवून लावले होते. तरीही तिथे एक मशीद उभारण्यात आली. वर्ष १७५४ मध्ये म्हणजे तब्बल ६४ वर्षांनी पेशव्यांनी पुन्हा त्र्यंबकेश्वर मंदिराची उभारणी केली. औरंगजेबाचा उदोउदो करणारी जमात आजही भारतात अस्तित्वात आहे. तिला हिंदूंच्या मंदिरांविषयी द्वेष आहेच. त्यामुळे प्रसंग लहान असतांनाच त्यामागील मानसिकता आवरणे आवश्यक आहे. यासाठी आता धर्मरक्षणार्थ हिंदूंनी मंदिरांसंदर्भात कट्टर नियम बनवावेत आणि त्यांचे पालन होण्यासाठी आग्रही असावे. लोकशाहीने दिलेले हे अस्त्र हिंदूंनी कुशलतेने वापरून धर्मरक्षणार्थ सिद्ध व्हावे !
हिंदूंंनी तीर्थक्षेत्रांच्या संदर्भात कठोर नियम बनवून त्यांच्या पालनासाठी आग्रही रहाणे आवश्यक ! |