मानसिकता पालटायला हवी !

द केरल स्टोरी

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात कसे अडकवले जात आहे ? हे दाखवणारा आणि सर्वांमध्ये विशेषतः हिंदूंमध्ये जागृती होण्यासाठी बनवण्यात आलेला चित्रपट आहे, असे म्हणावे लागेल. असे असले, तरी ‘जोपर्यंत संकट आपल्या घरापर्यंत येत नाही, तोपर्यंत त्याचे मला काय ?’, अशी मानसिकता सर्वांची झाली आहे. ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट बघितल्यावर जाणवले की, आपल्या हिंदु कुटुंबांनी हा चित्रपट परिवारासह चित्रपटगृहात जाऊन अवश्य बघावा. ‘लव्ह जिहाद’ कसा घडवला जातो ? त्याचा उद्देश काय ? आणि त्यातील गांभीर्य ओळखून हिंदूंंनी सावध व्हायला हवे; पण तसे होतांना दिसत नाही, असे खेदाने म्हणावे लागते.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट आला आणि सर्व वातावरण तात्पुरते ढवळून निघाले. सर्वांच्या मनामध्ये एक चीड निर्माण झाली. त्यानंतर काही दिवसांत श्रद्धा वालकरचे आफताब पूनावालाने ३५ तुकडे केले. यानंतरही मोठ्या प्रमाणात हिंदूंमध्ये जागृती झाली, हिंदू समाज रस्त्यावर उतरला, ही गोष्ट चांगली झाली; परंतु अजून लव्ह जिहाद थांबला नाही, हेही तितकेच खरे आहे. समस्येचे समूळ निराकरण होईपर्यंत आवाज उठत राहिला, तरच समस्या संपणार आहेत. यासाठी सर्वांगाने सतर्क आणि संवेदनशील असणे महत्त्वाचे आहे, तेव्हाच ‘लव्ह जिहाद’चे समूळ उच्चाटन होईल. ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट डोळ्यात अंजन घालणारा आहे. हिंदूंनी यातून काहीतरी बोध घ्यायला हवा. आपल्या मुलांना धर्म संस्काराचे बाळकडू घरातूनच देऊया. चित्रपटात मुलगी म्हणते, ‘आमच्या येथे जेवतांना प्रार्थनाच होत नाही.’ हिंदूंंसाठी हे किती लज्जास्पद आहे ! आजची पिढी देशाचे भविष्य आहे. त्यामुळे त्यांचे आध्यात्मिकदृष्ट्या संगोपन करणे, हे आपले कर्तव्य आहे. अधर्मियांची संस्कृती नव्हे, तर ती विकृती आहे. आहार, निद्रा, भय आणि स्वैराचार एवढेच त्यात असते.

हिंदूंंची संस्कृती महान जीवन मूल्ये जगायला शिकवणारी आहे. योग्य-अयोग्याची जाणीव प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला बुद्धीने करून द्यायला हवी. प्रत्येक आईने ‘जिजाई’ व्हावे, तसेच घराघरातून छत्रपती शिवाजी महाराज आणि झाशीची राणी जन्माला यायला हवी, तरच ‘लव्ह जिहाद’सारख्या संकटाला खंबीरपणे विरोध होईल. सर्व प्रकारची संकटे धर्माचरणाच्या आधारावर नष्ट करता येतात, हेही पाल्यांना शिकवणे आवश्यक !

– सौ. रमा देशमुख, नागपूर