केरळमध्ये नौका उलटल्याने २२ पर्यटकांचा मृत्यू

मलप्पूरम् (केरळ) – येथील तनूर भागातील थूवल थेरम टूरिस्ट स्पॉटवर पुरपुझा नदीत ७ मे या दिवशी सायंकाळी पर्यटकांसाठीची डबल डेकर (एक मजली नौका) नौका उलटून झालेल्या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला.

या नौकेत ४० जण होते. नौका बुडल्यावर लगेचच साहाय्यता कार्य केल्याने अनेकांना वाचवण्यात यश आले. मृतांमध्ये मुले आणि महिला यांची संख्या अधिक आहे. ४ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. नौकेमध्ये असलेले पर्यटक मलप्पूरम् जिल्ह्यातील परप्पनंगडी आणि तनूर भागातीलच होते. विशेष म्हणजे नौकाचालकांना सायंकाळी ५ वाजेपर्यंतच नौका चालवण्याची अनुमती असतांना सायंकाळी ७ वाजता ही नौका पर्यटकांना घेऊन जात होती. या नौकेच्या मालकाकडे नौकेच्या सुरक्षेच्या संदर्भात जे प्रमाणपत्र आवश्यक असते, तेही नसल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून अपघाताविषयी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाइकांना २ लाख रुपयांचे साहाय्य देण्याचे घोषित केले आहे.