सूर्याेदयापूर्वी उठण्याचे महत्त्व

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १९२

ब्राह्ममुहूर्त

‘गुजरात येथील सुप्रसिद्ध वैद्य पंचाभाई दमानिया यांनी त्यांच्या एका मार्गदर्शनामध्ये त्यांचे एक महत्त्वाचे निरीक्षण सांगितले. त्यांच्याकडे आतापर्यंत कर्करोगाचे जेवढे रुग्ण आले, त्या सर्व रुग्णांना सकाळी उशिरापर्यंत झोपायची सवय होती. ब्राह्म मुहूर्तावर (सूर्याेदयाच्या ४८ ते ९६ मिनिटे पूर्वी) उठणार्‍या व्यक्तींना कधी कर्करोग झाल्याचे वैद्य दमानिया यांना आढळले नाही.

ब्राह्म मुहूर्तावर उठल्यावर मलमूत्राचे विसर्जन आपसूक होते. शरिरामध्ये मलद्रव्ये साठून रहात नाहीत. त्यामुळे कर्करोगासारख्या रोगांपासून प्रतिबंध होण्यास साहाय्य होते. यामुळे नेहमी सकाळी न्यूनतम सूर्याेदयापूर्वी उठावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका : http://bit.ly/ayusanatan