(म्‍हणे) ‘काश्‍मीरप्रश्‍नी भारत आणि पाकिस्‍तान यांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये !’ – चीन

दोन्‍ही देशांनी चर्चेद्वारे प्रश्‍न सोडवण्‍याचेही आवाहन !

आयोजित पत्रकार परिषदेत ( डावीकडून ) किन गँग, बिलावल भुट्टो

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यात अनेक वर्षांपासून काश्‍मीरवरून वाद चालू आहे. हा वाद संयुक्‍त राष्‍ट्रांतील प्रस्‍ताव आणि द्विपक्षीय करार यांच्‍या आधारे सोडवला पाहिजे. या प्रकरणी दोन्‍ही देशांनी कोणताही एकतर्फी निर्णय घेऊ नये. त्‍यामुळे स्‍थिती बिघडू शकते, असे आवाहन चीनचे परराष्‍ट्रमंत्री किन गँग यांनी केले. ते २ दिवसांच्‍या पाकच्‍या दौर्‍यावर आहेत. त्‍यांनी पाकचे परराष्‍ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांची भेट घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

किन गँग पुढे म्‍हणाले की, चीन, पाकिस्‍तान आणि अफगाणिस्‍तान हे शेजारी देश आहेत. पाक आणि अफगाणिस्‍तान यांनी एकत्र येऊन त्‍यांच्‍यातील संबंध अधिक चांगले करण्‍याची आवश्‍यकता आहे. आम्‍हाला आशा आहे की, तालिबान सर्व जाती आणि धर्म यांच्‍या लोकांना समान अधिकार प्रदान करील. (तालिबानकडून भाबडी आशा ठेवणारा चीन ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • काश्‍मीर हा भारताचा अविभाज्‍य भाग आहे आणि तो कायम रहाणार. भारताने याविषयी काय करावे आणि काय करू नये ? हे चीनने सांगण्‍याची आवश्‍यकता नाही, असे भारताने खडसावले पाहिजे !
  • काश्‍मीरवरून चीनने भारतविरोधी सूर आळवल्‍यावर भारतानेही ‘चीनने तैवान आणि हाँगकाँग यांवरील दावा सोडावा’, असे ‘जशास तसे’ प्रत्‍युत्तर दिले पाहिजे !