हिंदूंनी काळाची आवश्यकता ओळखून प्रतिकार करायला शिकायला हवे ! – अधिवक्ता प्रसून मैत्र, अध्यक्ष, ‘आत्मदीप’ संघटना

अधिवक्ता प्रसून मैत्र

बंगालमध्ये मुसलमान समाजाने काहीही केले, तरी कायदेशीरदृष्टया योग्य ठरवले जाते आणि त्याचे समर्थन केले जाते, अशी तेथील राजकीय पक्षाची मानसिकता आहे. आज हिंदूंना दुर्बल समजून कायद्याचा धाक दाखवला जातो. भगवान श्रीकृष्णाचा शांतीचा प्रस्ताव कौरवांनी धुडकावून लावल्यावर शेवटी पांडवांना युद्ध करावेच लागले. हिंदूंनी सुद्धा आता केवळ वार्तालापाच्या भूमिकेत न जाता काळाची आवश्यकता ओळखून प्रतिकार करायला शिकायला हवे. (एप्रिल २०२३)