मंदिरे ही हिंदूंच्‍या उपासनेची केंद्र व्‍हायला हवीत !

मंदिराचे प्रांगण हे हिंदूंना धर्मदृष्‍टीतून मार्गदर्शन करणारे, त्‍यांना धर्माचरणासाठी उद्युक्‍त करणारे, तसेच त्‍यांच्‍यात राष्‍ट्राभिमान निर्माण करणारे दालन हवे. सामान्‍य भक्‍तांंना मंदिर हे त्‍यांच्‍या उपासनेमध्‍ये साहाय्‍य करणारे आणि साधनेसाठी प्रोत्‍साहित करणारे, हिंदूंना धर्मशिक्षण देणारे, येणार्‍या पिढीवर चांगले संस्‍कार होण्‍यासाठी साहाय्‍य करणारे असे असायला हवे. पर्यायाने हिंदूंच्‍या जीवनाला सर्वांगीण दृष्‍टी देणारी ती पाठशाळा हवी !