बजरंग दलाच्या दलित समर्थकाची हत्या करणार्‍या ४ धर्मांध मुसलमानांना अटक !

अरविंद सागर

नैनीताल (उत्तराखंड) – बजरंग दलाचा येथील समर्थक आणि दलित अरविंद सागर यांची ३० एप्रिल या दिवशी गोळीबार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी आझम, इरफान, रिझवान आणि साबिर या धर्मांध मुसलमानांना अटक करण्यात आली आहे.

२४ वर्षीय अरविंद यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हत्यारे त्यांच्या घरी आले. त्यांनी अरविंदला बाहेर बोलावून २५० मीटर दूर नेले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. एक मासापूर्वी हत्यार्‍यांचा अरविंदशी वाद झाला होता. त्या वेळी २०-२५ लोक आमच्या घरात घुसून त्यांनी घरातील महिलांना हात लावला होता. यासंदर्भात पोलिसांत तक्रार करूनही कोणती कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांनी मात्र एक मासापूर्वीच्या घटनेविषयी नकार दिला आहे. पोलिसांनी हत्येच्या घटनेच्या ३६ घंट्यांच्या आत हत्यार्‍यांना अटक केली आहे.

संपादकीय भूमिका 

हिंदुत्वनिष्ठच नाहीत, तर त्यांचे समर्थकही आता असुरक्षित जीवन जगत आहेत, हेच या घटनेतून लक्षात येते !