१. श्री. किशोर किंजवडेकर, ओल्ड गोवा
१ अ. आश्रमात उत्कृष्ट व्यवस्थापन पहायला मिळाले ! : ‘आश्रमात आल्यावर मला ‘उत्कृष्ट व्यवस्थापन, शिस्त आणि साधकांनी अत्यंत मनापासून केलेली सेवा’, हे सर्व पहायला मिळाले. येथे आल्यावर मला पुष्कळ आनंद मिळाला. ‘आपणही येथे साधक म्हणून यावे’, अशी तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली.
१ आ. आश्रमात ‘लहान लहान गोष्टींचा सखोल अभ्यास केला जातो’, असे माझ्या लक्षात आले.’ (११.९.२०२२)
२. श्री. मयूर आनंद बिरंजे, गडहिंग्लज, कोल्हापूर.
२ अ. आश्रमात सात्त्विकता जाणवून ‘आश्रमाचे कार्य लोकांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे’, असे वाटले ! : ‘आश्रमात आल्यावर मला सात्त्विकता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवली. मी देवतांच्या मूर्तींचे दर्शन घेतल्यावर मला मूर्तीतील भाव अनुभवायला मिळाला. इतर लोकांनाही आश्रमाचा अनुभव घेता यावा, यासाठी आश्रमाचे कार्य लोकांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. त्यामुळे लोक धार्मिकतेकडे अधिक प्रमाणात आकर्षित होतील !’ (२०.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |