‘आजारपणामुळे माझे मन त्रस्त झाले असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी मी एका साधकाशी बोलत होतो. त्या वेळी गुरुदेवांची वैशिष्ट्ये माझ्या मनात आली. ती काव्यरूपाने शब्दबद्ध करून परात्पर गुरुदेवांच्या चरणी समर्पित करत आहे.’
करुणाघना श्रीमन्नारायणा ।
नलिनीसुता भवमोचना ।। १ ।।
विश्ववंदना रूपमनोहरा ।
आनंदघना मनमोहना ।। २ ।।
विष्णुस्वरूपा सद्गुरुसमर्था ।
कमलनयना सच्चिदानंदा ।। ३ ।।
अनिष्ट शक्ती निर्दालना ।
ज्ञानभास्करा भावातिता ।। ४ ।।
ईश्वरी राज्य प्रस्थापना ।
विद्या कला संशोधका ।। ५ ।।
संस्कृतिरक्षका पाखंडखंडना ।
अधर्मभञ्जना धर्मसंस्थापका ।। ६ ।।
साधक वंदिती तव चरणा ।
न कळे महती मज पामरा ।। ७ ।।
शब्द हे बोबडे अर्पितो तवचरणा ।
उद्धरावे साधकजिवां ही प्रार्थना ।। ८ ।।
द्यावे स्थान तव चरणी शरणागता ।
कृतज्ञता तव चरणा शतशत कृतज्ञता ।। ९ ।।
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |