पोलीस ठाण्यात ‘झोमॅटो’ आणि ‘नझीर फूड्स’ यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !
नोएडा (उत्तरप्रदेश) – ‘सुदर्शन न्यूज’ या हिंदी वृतवाहिनीच्या सूत्रसंचालिका कनिका अरोरा यांनी ‘झोमॅटो’ या ऑनलाईन मागणीनुसार खाद्यपदार्थ घरपोच करणार्या आस्थापनाच्या आणि ‘नझीर फूडस’ या दुकानाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. यात म्हटले आहे, ‘त्यांनी शाकाहारी पदार्थाऐवजी मला मांसाहारी पदार्थाचे वितरण केले. ‘पनीर रोल’ऐवजी ‘चिकन रोल’ पाठवले. यामुळे माझा धर्म भ्रष्ट झाला.’ कनिका यांनी वृत्तवाहिनीवर हे खाद्यपदार्थ आणि त्याचे देयक दाखवले.
जेमोटे ने वेज आर्डर करने पर नॉनवेज भेजा, नजीर रेस्टोरेंट ने दिखाई अपनी मानसिकता @zomato @Uppolice pic.twitter.com/NTjFsi9ChY
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) April 18, 2023
संपादकीय भूमिकाअशा घटनांमुळे हिंदूंनी अन्य धर्मियांच्या दुकानांतून खाद्यपदार्थ घेणे बंद केले, तर आश्चर्य वाटू नये ! |