‘रुग्णालयात नामजपादी उपाय करणे महत्त्वाचे असणे’, या विषयी एका संतांनी केलेले मार्गदर्शन !

‘साधकाला वैद्यकीय उपचार किंवा अन्य कारणे यांसाठी रुग्णालयात जावे लागते. तेथे जाण्यापूर्वी साधकाने नामजपादी उपाय करणे महत्त्वाचे असते. त्यामागील एका संतांनी सांगितलेली आध्यात्मिक कारणे पुढे दिली आहेत.

श्री. सुरेंद्र होनप

१. रुग्णालयातील वातावरण स्मशानातील रज-तमाप्रमाणे असते. रुग्णालयामध्ये १ वर्षापर्यंतच्या मुलाचा मृत्यू झालेला असल्यास त्याचा लिंगदेह तेथे फिरत असतो, तसेच रुग्णालयात मृत झालेल्या व्यक्तींचे, अकाली मृत्यू झालेले, अपघातामुळे मृत्यू ओढावलेले, तसेच गर्भावस्थेत मृत झालेल्या स्त्रियांचे लिंगदेह फिरत असतात. त्यांपैकी वाईट लिंगदेह तेथे उपद्रव करत असतात.

२. रुग्णालयामध्ये १ वर्षापर्यंतच्या मुलांचे मृत्यू झालेले असल्यास त्या लिंगदेहांना ‘कच्चा कलुआ’, असे म्हणतात. यांतील वाईट लिंगदेह रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि तेथील परिचारिका यांना त्रास देऊ शकतात. हे वाईट लिंगदेह रुग्णालय, तसेच आध्यात्मिक ठिकाणी उपद्रव माजवू शकतात.

३.  १ ते १५ वर्षांपर्यंत रुग्णालयात मृत्यू पावलेल्या मुलांपैकी वाईट लिंगदेहांना ‘काला कलुआ’, ‘कच्चा कलुआ’, ‘देढ फुटीया (फूट)’ आणि ‘साडेपाच फुटीया (फूट)’, असे म्हणतात. तेही रुग्णालयात उपद्रव माजवत असतात. त्याचा त्रास रुग्णालयातील लोकांना होत असतो.

त्यामुळे रुग्णालयात जातांना किंवा तेथे उपचारांसाठी भरती असतांना साधकांनी नामजपादी उपायांवर भर देणे महत्त्वाचे असते.’

– श्री. सुरेंद्र होनप ((कै.) पू. पद्माकर होनप यांचा मधला मुलगा), नाशिक. (४.११.२०२२)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.