सातारा, १० एप्रिल (वार्ता.) – लंपी रोगाच्या प्रादुर्भावामुळे सातारा जिल्ह्यात १ सहस्र ४५६ जनावरांचा मृत्यू झाला होता. याच्या प्रतीपूर्तीसाठी शेतकर्यांना अर्थसाहाय्य म्हणून शासनाच्या वतीने ३ कोटी ७७ लाख ८९ सहस्र रुपये देण्यात आले आहेत. हे अनुदान शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले असून असे अनुदान वाटप करणारा सातारा जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, अशी माहिती जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.
डॉ. परिहार पुढे म्हणाले की, लंपी हा रोग केवळ गोवंश आणि महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. सातारा जिल्ह्यातील ६०० टक्के म्हणजेच ३ लाख ४७ सहस्र जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले होते.