नागपूर-अमरावती महामार्गावर शिवशाही बसने घेतला पेट !

१६ प्रवासी बचावले !

नागपूर-अमरावती महामार्गावर शिवशाही बसने घेतला पेट

नागपूर – नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ४ एप्रिलला सकाळी अमरावतीच्या दिशेने जाणार्‍या शिवशाही बसला अचानक आग लागली. बसमध्ये १६ प्रवासी होते. प्रवासी, बसचालक आणि वाहक बसमधून उतरल्याने अनर्थ टळला. आगीत प्रवाशांचे साहित्य जळले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली.