धर्मांधाकडून कामगाराची २ लाख रुपयांची फसवणूक !

बारामती – येथे मानवाधिकार संघटनेची धमकी देऊन कामगाराची २ लाख ६५ सहस्र रुपयांची फसवणूक करण्याची घटना घडली. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. आरोपी अमिन शेख हा ऑल इंडिया मानवाधिकार संघटनेशी संबंधित आहे. त्याच्या विरोधात नवनाथ माने यांनी तक्रार नोंदवली. (लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !  – संपादक) माने हे मोलमजुरी करून उपजीविका करतात. स्वतःला रहाण्यासाठी जागा असावी म्हणून त्यांनी शेख याच्याकडून २ गुंठे प्लॉट (भूमीचा तुकडा) विकत घेण्यासाठी त्याला २ लाख ६५ सहस्र रुपये ऑनलाईन, रोख आणि धनादेश यांद्वारे दिले; मात्र पैसे घेऊनही भूमीचा तुकडा शेख याने दिला नाही. माने यांनी पैसे देण्याविषयी विचारले असता त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून मानवाधिकार संघटनेची धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी शेख याच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.