हेच आक्रमण वाहिन्‍यांच्‍या कार्यालयावर झाले असते, तर त्‍यांनी किती वेळ ‘ब्रेकिंग न्‍यूज’ चालवली असती ?

प्रतिकात्मक छायाचित्र

‘एबीपी माझा’ आणि ‘झी २४ तास’ या वाहिन्‍यांनी ‘सामाजिक सौहार्दता’ आणि सरकारच्‍या आवाहनाला प्रतिसाद म्‍हणून छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांधांनी हिंदूंच्‍या मंदिरावर आणि हिंदूंवर, तसेच त्‍यांच्‍या वाहनांवर आक्रमण करून दंगल केल्‍याच्‍या वृत्ताचे व्‍हिडिओ प्रसारित करण्‍यास नकार दिला आहे.

हेच धर्मांधांच्‍या संदर्भात घडले असते, तर माध्‍यमांनी ही भूमिका घेतली असती का ? जे व्‍हिडिओ सर्वत्र प्रसारित झाले आहेत, ते न दाखवण्‍यामागे माध्‍यमांची कोणती पत्रकारिता आहे ? आता वृत्त दाबल्‍यामुळे धर्मांधांचा धीर चेपून अशा प्रकारच्‍या दंगली यापुढेही होत राहिल्‍या, तर माध्‍यमे हीच भूमिका घेणार का ? सर्वधर्मसमभावाप्रमाणे ‘सामाजिक सौहार्दता’ केवळ हिंदूंनीच पाळायची का ?

‘४ दशकांपूर्वी काश्‍मीरमध्‍ये झालेल्‍या घटनांच्‍या वेळी ‘सारे जग शांत राहिले’, त्‍याचा परिणाम तेथून हिंदूंचे स्‍थानांतर झाले’, या इतिहासातून माध्‍यमे काहीच शिकली नाहीत का ?

संपादकीय भूमिका

हिंदूंवरील अन्‍यायाची वृत्ते दाबवणार्‍या वाहिन्‍या हिंदूंनी का पहाव्‍यात ?