बांगलादेशी मुसलमानांची जिहादी वृत्ती स्पष्ट करणारे तस्लिमा नसरीन यांचे ट्वीट !

तस्लिमा नसरीन

नवी देहली – न्यूयॉर्क येथील ‘जॅक्सन हाइट्स’ क्षेत्रात असलेल्या ‘सेव्हेंटी थर्ड स्ट्रीट’ला आता ‘बांगलादेश मार्ग’ (स्ट्रीट) म्हटले जाते. यामुळे ‘बांगलादेश अथवा या मार्गाच्या परिसरात रहाणारे लोक हे अल्प जिहादी आणि अधिक धर्मनिरपेक्षतावादी होतील का ?’ निश्‍चितच नाही !’, अशा प्रकारे बांगलादेश मूळच्या आणि सध्या देहलीत वास्तव्य करणार्‍या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी बांगलादेशी मुसलमानांची जिहादी वृत्ती स्पष्ट करणारे उपरोधिक ट्वीट केले आहे.