गोवा : कांदोळी-कळंगुट येथील १६१ अवैध शॅक्सना टाळे

अवैध शॅक्स

पणजी, २८ मार्च (वार्ता.) – कांदोळी-कळंगुट समुद्रकिनार्‍यावरील प्रदूषण नियंत्रण मंडळाची अनुज्ञप्ती नसलेल्या १६७ पैकी १६१ शॅक्सना नोटीस बजावून मंडळाने त्यांचा व्यवसाय २८ मार्चपासून बंद केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिलेल्या आदेशानंतर मंडळाने ही कारवाई केली आहे. न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, जोपर्यंत शॅक्सचालकांना पर्यटन खात्याकडून अंतिम अनुज्ञप्ती मिळत नाही, तोपर्यंत शॅक्स चालू करण्यास देऊ नयेत. बंद करण्यात आलेले शॅक्स चालू होणार नाहीत, याचे दायित्व जिल्हाधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे राहील.

(सौजन्य : Prudent Media Goa)  

संपादकीय भूमिका

अवैध शॅक्स असणे प्रशासनाला लज्जास्पद !