भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील स्थिती नाजूक ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर (उजवीकडे)

नवी देहली – भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील स्थिती अद्यापही नाजूक आहे; कारण आमचे सैनिक अशा ठिकाणांवर तैनात आहे, जी अत्यंत धोकादायक आहेत. जोपर्यंत सप्टेंबर २०२० मध्ये चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी झालेल्या सैद्धांतिक करारानुसार सीमावादावर उपाय निघत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांतील संबंध सामान्य होऊ शकत नाहीत, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे आयोजित ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलतांना दिली.

डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, सध्या दोन्ही देशांचे सैनिक काही भागांतून माघारी फिरले आहेत आणि काही सूत्रांवर चर्चाही चालू आहे. आम्ही चीनला स्पष्ट केले आहे की, आम्ही शांतता भंग करणार नाही, तुम्ही कराराचे उल्लंघन करू शकत नाही. भारतात जी-२० देशांच्या काही आठवड्यांपूर्वी झालेल्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीमध्ये चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग यांच्याशी सध्याच्या सीमेवरील स्थितीविषयी चर्चा झाली होती.