अरुणाचल प्रदेशमध्‍ये सैन्‍याचे चित्ता हेलिकॉप्‍टर कोसळले : दोन्‍ही वैमानिक बेपत्ता

चित्ता हेलिकॉप्‍टर

इटानगर (अरुणाचल प्रदेश) – अरुणाचल प्रदेशातील मांडला हिल परिसरात भारतीय सैन्‍याचे चित्ता हेलिकॉप्‍टर कोसळले. यातील दोन्‍ही वैमानिक बेपत्ता आहेत. त्‍यांचा शोध घेण्‍यात येत आहे. हे हेलिकॉप्‍टर सेंगे ते मिसमरी या हवाई मार्गावर उड्डाण करत होते. यापूर्वी वर्ष २०२२ मध्‍ये राज्‍यातील तवांगजवळ चित्ता हेलिकॉप्‍टर कोसळून २ वैमानिकांपैकी एकाचा मृत्‍यू झाला होता.