नेपाळमध्ये भारतीय टॅक्सींना प्रवेशबंदी !

काठमांडू (नेपाळ) – भारतीय क्रमांक असणार्‍या टॅक्सींना नेपाळमध्ये प्रवेश नाकारण्यात येत असल्याने टॅक्सीचालक आणि मालक यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नेपाळच्या महाकाली आणि पवनदूत वाहतूक सेवा प्रशासनाने देहली किंवा अन्य ठिकाणांहून नेपाळच्या कंचनपूर जिल्हा मुख्यालय असलेल्या महेंद्रनगर येथे येणार्‍या वाहनांना रोखण्याची मागणी केली होती. त्यावरून जिल्हाधिकार्‍यांनी टॅक्सींच्या संदर्भात हा निर्णय घेतला. खासगी गाड्या आणि मैत्री बस यांच्यावर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत.