पाकिस्तान सरकारने देशात कायद्याचे राज्य आणावे ! – अमेरिका

ब्रॅड शर्मन

कॅलिफोर्निया (अमेरिका) – पाकिस्तान सरकारने देशात अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य आणावे, अशा शब्दांत अमेरिकन संसदेच्या विदेश व्यवहार समितीचे वरिष्ठ सदस्य ब्रॅड शर्मन यांनी पाकला सुनावले. ब्रॅड शर्मन यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आम्ही पाकिस्तानमध्ये वाढत्या हिंसाचाराच्या घटनांविषयी चिंतित आहोत. तेथील मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या विरोधात आवाज उठवायला आम्ही मागे-पुढे पहाणार नाही. पाकिस्तानातील वाढत्या आतंकवादी कारवाया, असहिष्णुता आणि असंतोष यांमुळे पाकमधील सामाजिक एकता धोक्यात आली आहे. अमेरिकेने जगभरात आणि विशेषत: पाकिस्तानमध्ये लोकशाही अन् मानवी हक्कांचे समर्थन केले पाहिजे.