(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती देऊ नये !’ – सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.)

सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची मंगळुरू पोलीस आयुक्तांना निवेदन !

(प्रतिकात्मक चित्र)

मंगळुरू (कर्नाटक) – संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या नावाखाली ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ हा देशविरोधी कार्यक्रम घेण्यासाठी व्यापक प्रचार केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी, तसेच वाहनांवर पत्रके लावण्यात आली आहेत. एवढेच नव्हे, तर सामाजिक माध्यमांतून याविषयी व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहेत. ही अवैध आणि देशविरोधी सभा आहे. या सभेसाठी कोणत्याही कारणाने अनुमती देऊ नये, असे निवेदन सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.) या पक्षाकडून पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. हा पक्ष बंदी घालण्यात आलेली जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची राजकीय शाखा आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की,

भारत हे धर्मनिरपेक्ष, तसेच प्रजासत्ताक  असलेले राष्ट्र असल्याचे राज्यघटनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. (तरीही या देशात गेली अनेक दशके मुसलमानांनी धर्माच्या नावाखाली किती सोयीसुविधा उकळल्या याचा हिशेब ते मांडतील का ? – संपादक) या देशाचा कोणत्याही धर्माच्या आधारावर ओळखला जाणारा देश म्हणून उल्लेख करणे, हे अवैध आणि देशद्रोही कृत्य आहे. (भारताला इस्लामी राष्ट्र करणार्‍यांच्या विरोधात हा पक्ष कधी तोंड उघडतो का ? स्वतःच्या पी.एफ्.आय.लाच भारताला इस्लामी राष्ट्र बनवायचे होते. त्यामुळे हा पक्ष कोणत्या तोंडाने हे तत्त्वज्ञान सांगत आहे ? – संपादक) त्यामुळे पोलीस विभागाने यावर गांभीर्याने विचार करून देशद्रोही कार्यक्रम घेण्यास कोणत्याही कारणाने अनुमती देऊ नये. संपूर्ण जिल्ह्यात फलक लावून समाजातील वातावरण गढूळ करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या विरुद्ध देशद्रोहाचा खटला प्रविष्ट करून आणि या संघटनेवर बंदी घालून संघटनेच्या प्रमुखांना अटक करण्यात यावी, अशी मागण्या करण्यात आल्या आहेत.


हिंदु राष्ट्र हे राजकीय नव्हे, तर आध्यात्मिक राष्ट्र ! – हिंदु जनजागृती समिती

मंगळुरू (कर्नाटक) – भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये ‘प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळावा’, असे नमूद करण्यात आले आहे; पण आपल्या देशात अल्पसंख्यांक आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे. दुसरीकडे  बहुसंख्य हिंदूंना संरक्षण देण्यासाठी कोणतेही मंत्रालय किंवा आयोग नाही. हिंदूंना न्याय देण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी १२ मार्च २०२३ या दिवशी सायंकाळी ५ वाजता मंगळुरू येथील कद्री मैदानावर हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी भाजपचे श्री. दिनेश जैन, श्रीराम सेनेचे प्रदेश सरचिटणीस श्री. आनंद शेट्टी अड्यार, कर्नाटक राज्याचे शेतकरी आणि हरित जनजागृती संघाचे सरचिटणीस श्री. गिरीश कोट्टारी आणि हिंदुस्थान जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. लोकेश उळ्ळाल उपस्थित होते.

डावीकडून श्री. लोकेश उळ्ळाल, श्री. दिनेश जैन, श्री. गुरुप्रसाद गौडा, श्री. आनंद शेट्टी अड्यार आणि श्री. गिरीश कोट्टारी

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या आयोजकांना धमकावणार्‍या धर्मांध एस्.डी.पी.आय.वर बंदी घालण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

गेल्या एका मासापासून समितीचे कार्यकर्ते कायदेशीर चौकटीत राहून या सभेचा घरोघरी जाऊन निमंत्रण देणे, पत्रके वितरित करणे, फ्लेक्स-फलक लावणे, उद्घोषणा करणे आदींद्वारे प्रसार करत आहेत; मात्र एस्.डी.पी.आय. या संघटनेचे धर्मांध सभेच्या आयोजकांना दूरभाष करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. याविषयी पोलिसांत तक्रारही करण्यात आली आहे. अशा धर्मांधांना आळा घालण्यासाठी एस्.डी.पी.आय.वर बंदी घालण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने पत्रकार परिषदेत केली.

संपादकीय भूमिका

  • हिंदु राष्ट्राच्या नावाने होणार्‍या सभेला जिहादी संघटना, पक्ष आणि नेते यांचा जळफळाट होणार, यात शंका नाही; मात्र राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यानुसारच ही सभा होत असल्याने कुणी कितीही आदळआपट केली, तरी त्याचा यावर काहीही परिणाम होणार नाही !
  • ‘मुळात देशात बंदी घालण्यात आलेल्या जिहादी आतंकवादी संघटनेची राजकीय शाखा चालू कशी ?’, हा प्रश्‍न राष्ट्रप्रेमींना पडला आहे. जिहादी कारवायांना उघड पाठिंबा देणार्‍या एस्.डी.पी.आय.वर प्रथम बंदी घाला !