जेव्‍हा नरसंहार नाकारला जातो, तेव्‍हा त्‍याची पुनरावृत्ती होते ! – राहुल कौल, राष्‍ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्‍मीर

सेक्‍युलर’वाद्यांकडून (निधर्मीवाद्यांकडून) जाणीवपूर्वक हिंदूंचा नरसंहार झालाच नाही, तर मुसलमानही मारले गेल्‍याचे सांगून नरसंहाराची धग अल्‍प करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ष १९९० पासून काश्‍मीरमध्‍ये हिंदु नरसंहाराच्‍या २२ मोठ्या घटना घडल्‍या. वर्ष २०१९ पासून २२ हिंदूंना वेचून मारण्‍यात आले. ५ लाख हिंदू काश्‍मीरमधून विस्‍थापित आहेत, हे या वेळी लक्षात घ्‍यायला हवे. जेव्‍हा नरसंहार नाकारला जातो, तेव्‍हा त्‍याची पुनरावृत्ती होते, हा मोठा धोका आहे. त्‍यामुळे देशभरात ‘काश्‍मिरी हिंदु वंशविच्‍छेद (जिनोसाईड) विधेयक’ पूर्णपणे लागू करावे.’