|
म्हापसा – एक विदेशी नागरिक कळंगुट येथील बाजाराचे चित्रीकरण करत असतांना तेथील धर्मांध मुसलमानाने कळंगुट बाजारातील एका भागाचा ‘पाकिस्तान गल्ली’ आणि ‘मुसलमान गल्ली’ असा उल्लेख केला. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यावर कळंगुट येथील राष्ट्राभिमानी नागरिकांनी धर्मांध मुसलमानाला गुडघ्यावर उभे करून कान पकडायला लावून क्षमा मागण्यास, तसेच त्याला ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा देण्यास भाग पाडले.
पाकिस्तानच्या टीमला पाठिंबा देणं ‘त्या’ मुस्लिम गोवेकराला पडले महागात, गुडघे टेकून म्हणाला ‘भारत…Watch Video#Goa #DainikGomantak https://t.co/1PDx8rpugt
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) February 24, 2023
या व्हिडिओमध्ये प्रारंभी एक विदेशी नागरिक कळंगुट येथील बाजाराचे चित्रीकरण करतांना दिसत आहे. चित्रीकरण करतांना विदेशी नागरिक बहुतांश मुसलमान रहात असलेल्या गल्लीजवळ पोचला असता तेथील एक धर्मांध मुसलमान त्याला ‘ही ‘पाकिस्तान गल्ली’ आणि ‘मुसलमान गल्ली’ आहे’, असे सांगतांना दिसत आहे.
हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यावर कळंगुट येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संबंधित धर्मांधाला याविषयी जाब विचारत, ‘भारताचे खाऊन पाकिस्तानला पाठिंबा देता येणार नाही. गोव्यात सर्व धर्मांचे आणि जातीचे लोक गुण्यागोविंदाने रहातात. तुम्ही येथे येऊन ‘पाकिस्तान गल्ली’ आणि ‘मुसलमान गल्ली’ असे संबोधून धार्मिक तणाव निर्माण करत आहात. असे केल्यास तुम्हाला कळंगुट येथे व्यवसाय करू देणार नाही. तुम्हाला पाकिस्तान आवडत असेल, तर पाकिस्तानमध्ये जाऊन व्यवसाय करा. तुम्ही लोकांच्या भावना दुखावल्या आहेत’, अशा शब्दांत सुनावले. याविषयीचे वृत्त देतांना गोव्यातील एका जुन्या दैनिकाने राष्ट्राभिमान्यांच्या या कृतीचा ‘कट्टर राष्ट्रवाद’ असा उल्लेख करत पाकधार्जिण्या मुसलमानांची बाजू घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
(कळंगुटच्या नागरिकांची ही कृती राष्ट्राभिमान दर्शवणारीच आहे. पाकिस्तान भारताचे शत्रूराष्ट्र आहे. त्याने भारतात आतंकवादी कारवाया केल्या आहेत. सीमेवर आतंकवादी तळ उभारले आहेत. त्यामुळे पाकिस्तान अन्य देशांशी खेळतांना केवळ धर्माने मुसलमान असल्याने गोव्यातील मुसलमान जर पाकिस्तानच्या बाजूने असल्याचे सार्वजनिकरित्या सांगणार असतील, तर त्यांच्या या धर्मांधतेला (कट्टरतेला) त्याच भाषेत उत्तर देऊन त्यांना क्षमा मागायला लावणे, हा प्रखर राष्ट्रवाद आहे. तथापि त्याला ‘कट्टर राष्ट्रवाद’, ‘ओंगळवाणे स्वरूप’ वगैरे संबोधणारी नियतकालिक हिंदुद्वेषीच होत ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|