हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा
काठमांडू (नेपाळ) – शिवरात्रीचे शास्त्र जाणून शिवाशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्याला साधना करून तमोगुणातून रजोगुणाकडे, रजोगुणातून सत्त्वगुणाकडे आणि शेवटी त्रिगुणातीत होऊन परमात्म्याची प्राप्ती करावी लागेल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथे महाशिवरात्रीनिमित्त ‘शिव सेना, नेपाळ’ यांनी आयोजित केलेल्यारुद्र महोत्सवात ते मार्गदर्शन करत होते. उपस्थितांच्या शंकांचे निरसन झाल्याविषयी आयोजकांनी समाधान व्यक्त केले.
‘आजची युवा पिढी देवपूजा करायला सिद्ध नसते’, याविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देतांना सद़्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले की, कर्मकांडाच्या पुढे उपासनाकांड आहे. त्यानुसार मानसपूजा, नामजप आदींच्या माध्यमातूनही देवाजवळ जाता येते.