पाकिस्तान यापूर्वी दिवाळखोर झालेला आहे ! – पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ (डावीकडे)

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान यापूर्वी दिवाळखोर झालेला आहे. आपण एका दिवाळखोर देशात रहात आहोत, असे विधान पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीच एका कार्यक्रमात केले आहे.

१. संरक्षणमंत्री आसिफ यांनी या दिवाळखोरीसाठी पाक सैन्य, प्रशासन आणि राजकीय नेते यांना उत्तरदायी ठरवले आहे; कारण ‘पाकमध्ये कायदे आणि राज्यघटना यांचे पालन केले जात नाही’, असा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानला स्थिर होण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

२. आसिफ म्हणाले की, आमच्या समस्यांचे उत्तर आपल्या देशातच आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे पाकच्या समस्यांचे उत्तर नाही. गेल्या अडीच वर्षांत पाकिस्तानमध्ये आतंकवाद्यांना आणण्यात आले, त्याचा परिणाम म्हणजे आता देशात आतंकवादी कारवाया चालू आहेत.