पाकची भूकंपग्रस्तांच्या साहाय्याच्या नावाखाली लज्जास्पद कृती !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने अत्यंत लज्जास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी आलेल्या महापुराच्या वेळी तुर्कीयेकडून साहाय्य म्हणून जे साहित्य पाकला पाठवण्यात आले होते, तेच साहित्य पाकने तुर्कीयेला तेथे आलेल्या भूकंपासाठी साहाय्य म्हणून परत पाठवले आहे.
बेशर्मी की हद पार… तुर्की ने बाढ़ में पाकिस्तान को भेजी थी जो मदद, ‘भूकंप राहत’ के नाम पर पैक करके भेज दिए वही पैकेट
#TurkeyPakistanNews #TurkeyPakistan https://t.co/v1Z0YXeKgb— NBT Hindi News (@NavbharatTimes) February 18, 2023
पाककडून तुर्कीयेला २१ कंटेनर पाठवण्यात आले होते. ते जेव्हा उघडण्यात आले, तेव्हा लक्षात आले की, हे साहित्य तुर्कीयेनेच पाकला पुराच्या वेळी पाठवले होते. या संदर्भात पाकमधील वरिष्ठ पत्रकार शाहिर मंजूर यांनी एका वृत्तवाहिनीवर दावा केला की, पाकने पाठवलेल्या साहित्यावर पाकने स्वतःचे नाव लिहिले असले, तरी त्यावर ‘तुर्कीयेकडून प्रेमाचे साहाय्य’ असे लिहिण्यात आल्याचे दिसून आलेले आहे.
संपादकीय भूमिकाज्याकडे स्वतःच्या देशातील नागरिकांना देण्यासाठी काही नाही, त्याने इतरांना साहाय्य देण्याचा असा लज्जास्पद प्रयत्न कदापि करू नये, हेच लक्षात येते ! पाकिस्तान्यांची मानसिकता कशी आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले ! |