नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठीच्या अभियानाला प्रारंभ !

पदच्युत केलेेले राजे ज्ञानेंद्र शहा यांनी अभियानाला दाखवला हिरवा झेंडा !

राजे ज्ञानेंद्र शहा

काठमांडू (नेपाळ)- नेपाळचे पदच्युत केलेले राजे ज्ञानेंद्र शहा यांच्या हस्ते नेपाळला पूर्वीप्रमाणे हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी एका अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. नेपाळच्या झापा जिल्ह्यातील काकरभिट्टा येथे या अभियानाला ज्ञानेंद्र शहा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. ‘या, धर्म, राष्ट्र, राष्ट्रवाद, संस्कृती आणि नागरिक यांना वाचवूया’ असे या अभियानाचे नाव आहे. या वेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. नेपाळमधील व्यावसायिक दुर्गा परसाई यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान चालू करण्यात आले आहे. दुर्गा परसाई हे माजी पंतप्रधान के.पी. ओली यांच्या ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाल-युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी’च्या केंद्रीय समितीचे सदस्य आहेत.

दुर्गा परसाई म्हणाले की, आम्ही कधीही आतासारख्या देशाची इच्छा बाळगली नाही. आम्हाला कधीही अशी लोकशाही अपेक्षित नव्हती, ज्यामध्ये १ कोटींहून अधिक नेपाळी तरुणांवर रक्त आणि घाम गाळण्यासाठी आखाती देशांमध्ये जाण्याची वेळ येईल.