अनेक जण वेडे झाल्याची माहिती !
अमृतसर (पंजाब) – पाकिस्तान सरकारने भारताच्या राजू आणि गेमबरा राम या दोघा बंदीवानांची सुटका केली. ते अटारी सीमेच्या मार्गे भारतात परतले. ए.एन्.आय. वृत्तसंस्थेने या दोघांकडून घेतलेल्या माहितीनुसार पाकमध्ये ७०० हून अधिक भारतीय नागरिक कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांची स्थिती इतकी वाईट आहे की, ती आम्ही सांगूही शकत नाही. ते वेडे झाले आहेत. भारत सरकारने लवकरात लवकर त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.
#WATCH via ANI Multimedia | “Prisoners cry, go mad…” Indian narrates horrific experience after serving jail time in Pakistan#Pakistan #LoChttps://t.co/pkru4VolFp
— ANI (@ANI) February 14, 2023
भारतीय अधिकारी अरुण पाल यांनी सांगितले की, राजू ५ वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानमध्ये गेला होता, तर गेमबरा राम एका मुलीचा पाठलाग करत पाकमध्ये पोचला होता. दोघांना अटक करून कारागृहात डांबण्यात आले होते.
संपादकीय भूमिकाभारतियांचा विविध प्रकारे छळ करणारा पाक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. तो कदाचित् भारताकडे साहाय्य मागण्याची शक्यता आहे, अशा वेळी भारताने पाकला साहाय्य करण्याऐवजी त्याचा विनाश होण्यासाठीच प्रयत्न करणे आवश्यक आहे ! |