श्रीसमर्थांच्या चळवळीची गतीसूत्रे

समर्थ रामदासस्वामी

‘समर्थ रामदासस्वामी यांच्या चळवळीविषयी विचार करतांना त्यांच्याविषयीच्या एका आक्षेपाचा विचार करणे आवश्यक आहे. ‘ते ब्राह्मणवादी होते किंवा ब्राह्मणांचे पक्षपाती होते !’, हा त्यांच्यावरील आधुनिक पुरोगामी सुधारणावाद्यांचा आक्षेप आहे. कोणत्याही महापुरुषाच्या विचाराचा मागोवा घेतांना त्याचा कालिक संदर्भ दृष्टीआड करता येणार नाही. समर्थांचा संपूर्ण कार्यकाळ हा आणीबाणीचा होता. कठोर आणीबाणीचा काळ ! आचार-विचारांची सामान्य स्थितीतील आणि आणीबाणीतील तर्‍हा यांत पुष्कळ अंतर असते. हे आम्ही नजिकच्या भूतकाळातील आणीबाणीत अनुभवलेले आहे. काहींनी समर्थांप्रमाणे गुप्तरूपे राजकारण करण्याची धडपड केली; पण ज्यांना ही धडपड झेपली नाही, त्यांनी आपल्या निष्क्रीयतेचे दायित्व मागील शतकावर टाकून भूमिकाच पालटली.’

(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, एप्रिल-जून २०२२)