
‘नूतन निर्मितीची समर्थांची (श्री समर्थ रामदासस्वामी यांची) प्रतिभा वैश्विक होती. त्यांचे दासबोधातील तत्त्वज्ञान सर्व मानवजातीच्या हिताचे तत्त्वज्ञान आहे. विश्वजनांच्या उद्धाराचा तो मार्ग आहे. ‘चिंता करतो विश्वाची’, हा संकल्पच त्यातून प्रकट होतो. ‘खल दुर्जनांनी भरलेले राजकारण नष्ट आणि अमंगलाचा नाश करून विवेक विचारांनी भरलेला समाज निर्माण करणे’, हेच समर्थांचे राजकारण आहे. भारतीय विचार परंपरेतील भव्य दिव्य तितके घेऊन आपल्या बलवत्तर निर्माण प्रतिभेने ऐहिक आणि अध्यात्माची एकरस मांडणी दासबोधात केली आहे. ‘आत्माराम दासबोध । माझें स्वरूप स्वतः सिद्ध ।’ म्हणजे ‘दासबोध म्हणजेच ‘आत्माराम’ हा ग्रंथ म्हणजे माझे सिद्ध स्वरूपच आहे’, असे संबोधाचे शेवटी समर्थांनी म्हटलेलेच आहे. दासबोधाचा हेतूही त्यांनी त्याच्या प्रारंभीच स्पष्ट केला आहे.’
(साभार : मासिक ‘प्रज्ञालोक’, जुलै-सप्टेंबर २०२२)