अंकारा (तुर्कीये) – तुर्कीये आणि सीरिया येथे ६ फेबु्रवारी या दिवशी आलेल्या ७.८ रिक्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपामुळे पृथ्वीवर ३०० कि.मी. लांब भेगा पडल्याचे निदर्शनास आले.
ब्रिटनमधील ‘सेंटर फॉर द ऑब्झर्व्हेशन अँड मॉडेलिंग ऑफ अर्थक्वेक्स’ने (‘कॉमेट’ने) भूमध्य समुद्राच्या ईशान्य टोकापासून पृथ्वीला पडलेल्या ३०० कि.मी.हून अधिक लांबीच्या भेगांचे चित्र प्रसारित केले आहे. या भूकंपामुळे झालेल्या मोठ्या विनाशाचे परिणाम जनतेसमोर आणण्यासाठी ‘कॉमेट’ने दोन्ही देशांची आधी आणि नंतरची छायाचित्रे टिपली आहेत. या चित्रांमध्ये भूकंपामुळे पृथ्वीला दोन मोठे तडे पडले असल्याचे दिसून आले. त्यांपैकी एक तडा १२५ कि.मी. लांबीचा, तर दुसरा तडा त्याहून मोठा आहे.