येत्या १४ फेब्रुवारीला केंद्रशासन साजरा करणार गायीला आलिंगन देण्याचा दिवस !

हिंदुद्वेषी ‘बीबीसी’वर बंदीच हवी !

केंद्रशासनाच्या पशूकल्याण मंडळाने येत्या १४ फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ (गायीला आलिंगन देण्याचा दिवस) साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर हिंदुद्वेषाची काविळ झालेल्या बीबीसीने एका व्यंगचित्राद्वारे याला हास्यास्पद ठरवण्याचा प्रयत्न केला.

बीबीसीकडून व्यंगचित्राद्वारे टीका

नवी देहली – केंद्रशासनाच्या ‘ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया’ने येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजे पाश्चात्त्यांच्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी ‘काऊ हग डे’ (गायीला आलिंगन देण्याचा दिवस) साजरा करण्याचे आवाहन केले आहे. लोकांना त्यांच्या संस्कृतीविषयी जागृत करणे, भावनात्मक समृद्धी आणि आनंद घेण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येत असल्याचे या बोर्डाकडून सांगण्यात आले आहे; मात्र हिंदुद्वेषाची काविळ झालेल्या बीबीसीने एका व्यंगचित्राद्वारे याला हास्यास्पद ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. बीबीसीने या व्यंगचित्रात म्हटले आहे, ‘येत्या आठवड्याभरात ‘काऊ गोबर डे’, ‘काऊ मूत्र डे’, ‘काऊ मिल्क डे’, ‘काऊ घास डे’ आदी साजरे करण्यात येतील.’ या व्यंगचित्राची पोस्ट बनवून बीबीसीने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली आहे. त्यावर मुसलमानांकडून गायीविषयी अवमानकारक विधाने करण्यात येत आहेत.


हे ही पहा –

हिन्दू जनजागृति समिति आयोजित 🚩
विशेष संवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की 🚩

⭕ भारतविरोधी BBC का हिन्दूद्वेष

‘गोबेल्‍स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्‍ट्रभक्‍तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, सनातन संस्‍था
https://sanatanprabhat.org/marathi/652629.html

संपादकीय भूमिका

गायीचे मूत्र, दूध आदींपासून औषध बनवले जाते. शेणाचा वापर करून घर प्रतिरोधक केले जाते. गोमूत्राचे ३ पेटंट अमेरिकेने बनवलेले आहेत. गायीच्या दुधाचे महत्त्व सर्वांनीच मान्य केले आहे. असे असतांना बीबीसीने केवळ हिंदुद्वेष दाखवण्यासाठीच हे व्यंगचित्र बनवल्याचे स्पष्ट होते ! अशा बीबीसीवर आता भारतात बंदी घालणेच योग्य ठरील !