आमचे सरकार दिवसाचे २४ घंटे, आठवड्याचे सातही दिवस जनतेसाठी काम करील ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

नागपूर – विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय कधीही आमच्या डोक्यात जाणार नाही. ही सत्ता आम्हाला कायम भूमीवर ठेवेल. सत्ता मिळाली म्हणून आमचे पाय हवेत जाणार नाहीत. आम्हाला केवळ लोकांच्या सेवेसाठी ही सत्ता मिळाली आहे. राज्य पालटण्यासाठी, लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी, त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी आपल्याला लोकांनी बहुमत दिले आहे. त्यामुळे आम्ही लोकांसाठी काम करू. माझे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह आम्ही महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण केल्याविना स्वस्थ बसणार नाही. आमचे हे सरकार दिवसाचे २४ घंटे, आठवड्याचे सातही दिवस तुमच्यासाठी काम करील. तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवलात, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रीमंडळाच्या शपथविधीपूर्वी केले.